पाच चिनी सैनिकांचा खात्मा
भारताचेही तीन जवान शहीद
भारत-चीन सीमेवर तणाव वाढला असून काल रात्री गलवान घाटीत दोन्ही देशाच्या सैनिकात झडप झाली. यात पाच चिनी सैनिकांचा खात्मा करण्यात आला असून भारताचेही तीन जवान शहीद झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भारत चीन सीमेवर तणाव वाढला आहे. दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आले आहेत. लडाख सीमेवर झालेल्या झटापटीत एक भारतीय सैन्य अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. भारताच्या प्रत्युत्तरातही चीनचे ५ जवान शहीद झाले असून ११ जण जखमी झाल्याची माहिती चीनच्या माध्यमांनी दिली आहे. चीनचं वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टर वँग वेनवेन यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पिपल्स लिबरेशन आर्मीचे ५ जवान मारले गेले असून ११ जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे भारतीय सैन्यानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी पठाणकोट दौरा रद्द केला आहे.
५० वर्षांनी पहिल्यांदाच चीनच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद
भारतीय बाजूकडूनच चीनच्या हद्दीत घुसखोरी करण्यात आली होती, असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे. तर भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ही झटापट झाली. या झटापटीत गोळीबार झाला नसून दगडफेक झाल्याची माहिती आहे. गलवान खोऱ्यात तणाव निवळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच चीन आणि भारतीय सैन्यात हिंसक झटापट झाली. यात भारतीय सैन्याचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले, असं अधिकृत वक्तव्य भारतीय सैन्याकडून जारी करण्यात आलं आहे..